Monday , September 21 2026
Breaking News

येळ्ळूर येथे २४ एप्रिल रोजी भव्य कुस्ती मैदान…

Spread the love

 

बेळगाव : श्री कलमेश्वर, श्री चांगळेश्वरीदेवी वाढदिवस, अशा संयुक्त यात्रोत्सवानिमित्त येळ्ळूर येथे येळ्ळूर कुस्तीगीर संघटना आयोजित गुरुवार दि. २४ रोजी बेमुदत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती कुस्ती समितीचे कार्याध्यक्ष प्रदीप देसाई यांनी दिली.

या मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती आंतरराष्ट्रीय मल्ल शेरा विरुद्ध आंतरराष्ट्रीय मल्ल मिर्झा इराण, दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती भारत केसरी, रुस्तम- ए- हिंद महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध भारत केशरी जम्मूचा अमीन बिनिया, आंतरराष्ट्रीय संकुनातील रवी उर्फ शिवा चव्हाण पुणे विरुद्ध भारत केसरी हरियाणाचा रोहित सम्चानिया तर चौथ्या क्रमांकाची कुस्ती उत्तर प्रदेश केसरी राजू मलंगा विरुद्ध कर्नाटक केसरी कार्तिक काटे या नामवंत मल्लामध्ये या जबरदस्त कुस्ती होणार आहेत. याशिवाय ८० हून अधिक चटकदार कुस्त्या घेण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रदीप देसाई यांनी दिली.

यावेळी अध्यक्ष भोला पाखरे, कुस्ती समिती सल्लागार दौलत कुगजी, सचिव दीपक कर्लेकर, खजिनदार दुधाप्पा बागेवाडी, सतीश कुगजी, हनुमंत पाटील, हनुमंत गुरव, विलास नंदी, मोहन कुगजी, श्रीधर कानशिडे, अनंत कुंडेकर, यल्लाप्पा पाटील, दोड्डणावर आदी मान्यवर पत्रिका परिषदेला उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *