बेळगाव : लक्ष्मी नगर, गणेशपूर येथील एका अपार्टमेंटमध्ये घुसून महिलेचे मंगळसूत्र हिसकावून तिचा गळा आवळून खून केल्याची घटना काल घडली आहे.
अंजना अजित दड्डीकर (वय 49, रा. लक्ष्मी नगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. एका अपार्टमेंटमध्ये पती-पत्नी राहत होते. ऑटोचालक असलेल्या अजित दड्डीकर काल संध्याकाळी घरी परतले असताना आपल्या पत्नीची हत्या झाल्याचे निदर्शनास आले. जखमी अंजना यांना बेळगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृताच्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातले, सोन्याची अंगठी चोरून अंजना यांचा खून केल्याचा संशय कुटुंबीयांनी लावला आहे.
ठसे तज्ञ कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta