
बेंगळूर यंग पायोनियर संघ उपविजेता
बेळगाव : निमंत्रितांच्या राज्यस्तरीय वरिष्ठांच्या प्रकाशझोतातील खो-खो स्पर्धेत अंतिम सामन्यात बेंगळूरच्या यंग पायोनियर संघाचा पराभव करीत अल्वास संघ विजेता ठरला.
साधना क्रीडा संघातर्फे आयोजित निमंत्रितांच्या राज्यस्तरीय वरिष्ठांच्या ह्या खो-खो स्पर्धा वडगावमधील जेल शाळा मैदानावर घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग असलेल्या राज्यातील 16 नामवंत संघानी भाग घेतला होता.
या स्पर्धेत पायोनियर बंगळूर संघाने तृतीय तर एफआरए शिमोगाने चौथा क्रमांक पटकावला.
विजेत्या अल्वास संघाला 25 हजार रुपये रोख व चषक तर उपविजेत्या संघाला 15 हजार रुपये रोख बक्षीस आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले. तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला 10 हजार तर चौथ्या क्रमांकाच्या विजेत्या संघाला 7 हजार रुपये व चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
याशिवाय उत्कृष्ट रनर, उत्कृष्ट डिफेंडर व उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंना वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली.
अशोक आयर्नचे व्यवस्थापक विरेश पाटील, जय भारत फाउंडेशनचे संचालक दयानंद कदम, आय. एस. नाईक, कल्लाप्पा तोपिनकट्टी आदी मान्यवरांच्या हस्ते यशस्वी संघांना सन्मानित करण्यात आले. यावेळी साधना क्रीडा संघाचे अध्यक्ष संजय बेळगावकर, साधना क्रीडा संघाचे सचिव सतीश बाचीकर, प्रकाश नंदीहळ्ळी, शिवानंद कोरे, अनिल कोरे, पी. ओ. धामणेकर, उपाध्यक्ष अशोक हलगेकर, विवेक पाटील, अरुण धामणेकर,उमेश पाटील, शेखर चोळाप्पाचे, सी. एम. गोरल, शैलेश बांदिवडेकर, प्रकाश देसाई आदी उपस्थित होते.
अल्टिमेट पद्धतीने नवीन नियमानुसार सहा पाट्यांच्या मैदानावर प्रत्येक संघात सात खेळाडूंचा समावेश होता. एका फेरीला सात मिनिटांचा वेळ होता व दोन फेऱ्यांमध्ये तीन मिनिटांची विश्रांती होती. जिल्ह्यात मॅटवर प्रथमच खोखो स्पर्धा झाल्याने क्रीडाप्रेमीची गर्दी झाली होती. बेळगाव जिल्ह्यातील दोन संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. रोज 300 लोकांच्या जेवण व राहण्याची सोय करण्यात आली होती.
Belgaum Varta Belgaum Varta