15 प्रवासी गंभीर जखमी
बेळगाव : बेळगाव – वेंगुर्ला मार्गावर ट्रक आणि बस यांच्या भीषण अपघात झाला असून या अपघातात बस चालक जागीच ठार झाला आहे. चंदगड येथील सुप्याजवळील गणपती मंदिराजवळ हा भीषण अपघात झाला असून या अपघातात चंदगड डेपोतील बस ड्रायव्हर लक्ष्मण हळदणकर (चंदगड) हे मृत झाले आहेत तर 15 प्रवासी जखमी झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास रिमझिम पाऊस झाला. यावेळी (के ए २५ ए बी ९७७५) या ट्रकने बेळगावला जाणाऱ्या (एमएच १४ बी टी १५४१) बसला जोराची धडक दिली. यामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर वाहक सुरेश मर्णहोळकर (रा. घुल्लेवाडी, ता. चंदगड) यांच्यासह ९ प्रवासी गंभीर जखमी झाले. यामधील अत्यवस्थ असलेल्या चार जणांना बेळगावच्या केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर ६ प्रवाशांना चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे २ तास वाहतुकीची कोंडी झाली. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. चंदगड पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
Belgaum Varta Belgaum Varta