बेळगाव : खनगाव येथे वीज पडून १५ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज घडली असून अत्सा जमादार असे या मुलीचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अत्सा जमादार ही शाळेला सुट्टी असल्यामुळे आपल्या आईसोबत शेतात गेली होती.
अचानक विजांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. दोघी झाडाखाली आसऱ्यासाठी थांबल्या असताना वीज कोसळली. अत्सा या मुलीवर वीज कोसळून तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मारिहाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला.
Belgaum Varta Belgaum Varta