Wednesday , March 4 2026
Breaking News

भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या बिरदेव ढोणेचा युवा समिती सीमाभागच्यावतीने सत्कार

Spread the love

 

बेळगाव : कोल्हापूर जिल्हा कागल तालुक्याच्या यमगे गावचा युवक बिरदेव सिद्दाप्पा ढोणे याने भारतीय लोकसेवा आयोगाच्या 2025 च्या परीक्षेत देशात 551 क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाला. मेंढपाळीचा व्यवसाय म्हणजेच बेळगाव सीमाभागातील विविध गावात भटकंती करत मेंढराना चारवत एका प्रतिकूल परिस्थितीतून भारतीय लोकसेवा आयोगाची परीक्षा बिरदेवने उत्तीर्ण केली.

या सत्कार प्रसंगी प्रास्ताविक करताना कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी बिरदेव ढोणे या युवकाने आपली मातृभाषा मराठीतून शिक्षण घेत एका प्रतिकूल परिस्थितून यशाला गवसणी घातली आहे, मंडोळी रोड येथे भटकंती करत आपल्या परिवारासह झोपडीत राहून यश गाठणे हे कौतुकास्पद आहे, याची प्रेरणा सर्वांनी घ्यावी, असे प्रतिपादन केले.

अध्यक्ष शुभम शेळके यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन बिरदेवचा सत्कार करण्यात आला. यावेळी शुभम शेळके यांनी बिरदेव ने जे यश गाठलेले आहे ते जिद्द व चिकाटीच्या जोरावर संपादन केले असून प्रत्येकाने आपली भाषा जी मातृभाषा असेल त्यातून शिक्षण घेतले पाहिजे, बिरदेवने मिळवलेल्या यशात त्याचा खडतर प्रवास पाहता हे फक्त कौतुकास्पद असून वाखानण्याजोगे आहे, “संत तुकारामाच्या पंक्तीप्रमाणे असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे” प्रमाणे बिरदेवचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

सत्काराला उत्तर देताना बिरदेव याने संघटनेचे आभार मानले व प्रत्येककाने आपल्या मातृभाषेत शिक्षण घेताना कुठलाही संकुचीत पणा न आणता यशाची गुरुकिल्ली जाणली पाहिजे, आर्थिक परिस्थितीची काळजी न करता जिद्दीने शिक्षण घेतल पाहिजे व प्रत्येकाने निर्व्यसनी राहून समाजाला एक चांगली दिशा दिली पाहिजे, असे मत व्यक्त केले.

यावेळी सरचिटणीस मनोहर हुंदरे, उपाध्यक्ष प्रवीण रेडेकर, विजय जाधव, भागोजी पाटील, अशोक घगवे, राजू पाटील, रणजीत हावळाणाचे, रमेश माळवी, सचिन दळवी, दिपक गौन्डवाडकर, शुभम जाधव, अभिषेक कारेकर, अशोक डोळेकर, विश्वनाथ येळ्ळूरकर आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *