बेळगाव : बेळगाव नगरीचा सुपुत्र आणि कर्नाटक रणजीपटू आणि यष्टीरक्षक सुजय संजय सातेरी याची ओमान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय निमंत्रित्यांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा २९ एप्रिल ते ४ मे पर्यंत आंतरराष्ट्रीय मैदानावर होणार आहे. कर्नाटकचा संघ पुढीलप्रमाणे कर्णधार मयंक अगरवाल, अनिश्वर गौतम, मॅक्नेल नॉरन्ना, प्रखर चतुर्वेदी, निकीन एस जे, अनिश के व्ही, यष्टिरक्षक सुजय सातेरी, कौशिक व्ही, समित द्रविड, अभिलाष शेट्टी, विद्याधर पाटील, हार्दिक राज, शशीकुमार के, पारस आर्या, विद्वत कावेराप्पा, व्यंकटेश एम, संघ प्रशिक्षक राजेश कामत, व्यवस्थापक अशुतोष ए पी, फिजिओ अभिषेक कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta