Wednesday , March 4 2026
Breaking News

सरकारी मराठी मॉडेल शाळेचा शतकोत्तरी सुवर्ण महोत्सव कार्यक्रम आजपासून

Spread the love

 

दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन; महनीय व्यक्तींची उपस्थिती

बेळगाव : येळ्ळूर येथील सरकारी मराठी मॉडेल शाळेला 150 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शाळेचा शतकोत्तरी सुवर्ण महोत्सव कार्यक्रम उद्या शनिवार दि. 26 आणि रविवार दि. 27 एप्रिल 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे. महोत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यासाठी सध्या जय्यत तयारी करण्यात येत आहे.
महोत्सवाची सुरुवात शनिवारी 26 एप्रिल रोजी सकाळी 8 ते 10 शिवस्मारक ते सैनिक भवन, येळ्ळूर पर्यंत प्रबोधन फेरीने होणार आहे. 10 वाजता शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समितीचे अध्यक्ष माजी ता. पं. सदस्य रावजी महादेव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रवादी पक्षाचे नेते व खासदार शरद पवार उपस्थित राहणार आहेत. स्मरणिकेचे प्रकाशन प्रमुख वक्ते शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते होणार आहे.
पहिल्या दिवशीच्या तिसऱ्या सत्रात जीएसएस कॉलेजचे माजी प्राचार्य आनंद मेणसे यांचे ‘प्राथमिक शिक्षण पुढील आव्हाने’ या विषयावर व्याख्यान होणार असून, शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रणधीर शिंदे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. चौथ्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आहे केले

दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात डॉ. डी. एम. पाटील, प्राचार्य घाळी कॉलेज यांचे ‘मराठी अभिजात भाषेची समृद्ध परंपरा’ या विषयावर व्याख्यान असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम ज्युनिअर कॉलेजचे प्रा. राम नांदुरकर हे आहेत. दुसऱ्या सत्रात हणमंत पाटील माजी शाळा सुधारणा समिती अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली माजी विद्यार्थ्यांसोबत स्मृतीना उजाळा हा कार्यक्रम होणार आहे.

तिसऱ्या सत्रात सत्कार समारंभ असून, चौथ्या सत्रात हभप ज्ञानेश्वर संजय बंडगर महाराज सांगोला यांचे “संत परंपरा व समाज प्रबोधन” या विषयावर व्याख्यान असून, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. वाय. एन. मेणसे संस्थापक सदगुरु शिक्षण संस्था कसबा बीड कोल्हापूर हे राहणार आहेत.
पाचव्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. दोन्ही दिवशी दुपारी २ ते ३ वेळेत स्नेहभोजन असणार आहे.
या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शतकोत्तरी सुवर्णमहोत्सव शाळा कमिटी स्वागताध्यक्ष, कार्यक्रमाचे अध्यक्ष व इतर मान्यवरांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बोडकेनट्टीत शनिवारी गिरणी कामगारांची बैठक

Spread the love  बेळगाव  : एकेकाळी मुंबईच्या कापड गिरण्यांमध्ये सिमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील हजारो कामगार घाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *