बेळगाव : व्याजाने घेतलेली रक्कम परत देत नसल्याच्या कारणातून लक्ष्मी नगर गणेशपूर येथील अंजना अजित दड्डीकर यांचा खून झाल्याची माहिती पोलीस तपासात आढळून आल्याने या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह माय-लेकींना कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २०१९ मध्ये ज्योती बांदेकर यांच्याकडून अंजना दड्डीकर यांनी १५ हजार हातउसने घेतले होते. त्या रकमेपोटी त्या व्याज व रक्कमही देत होत्या. परंतु, संपूर्ण रक्कम हवी, असे म्हणत ज्योती बांदेकर या अंजना दड्डीकर यांच्या घरी जाऊन धक्काबुक्की केल्यानंतर डोके किचन कट्ट्यावर आदळल्याने मृत्यू झाला. भितीपोटी त्यांनी नवीनच शक्कल लढवली. जाताना त्यांनी महिलेच्या गळ्यातील, कानातील तसेच अंगावरील १ लाख ७० हजार रूपयांचे सोन्याचे दागिने काढून नेले. चोरीच्या उद्देशाने खून झाल्याचे भासवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न माय-लेकींनी केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्या घराबाहेर पडल्यानंतर मुलाने त्यांना दुचाकीवरून नेले. त्यामुळे या तिघांवरही गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. न्यायालयासमोर उभे केले असता माय-लेकीची कारागृहात तर अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta