बेळगाव : प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी गार्डन येथील शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन उद्या मंगळवार दि. 29 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजता करण्यात येणार आहे. तसेच दि. 1 मे रोजी सायंकाळी 7 वाजता बॅरिस्टर नाथ पै चौक येथून मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन समारंभ होणार असून त्यानंतर लागलीच मिरवणुकीला सुरुवात होईल. मिरवणुकीचा मार्ग शहापूर खडे बाजार, शाम प्रसाद मुखर्जी रोड, ब्रिज वरून स्टेशन रोड, अंबा भवन, सेंट मेरी हायस्कुल मार्गे कॅम्प येथील उभा मारुतीकडून संभाजी चौकात येऊन मुख्य मिरवणुकीत सहभाग.
या सर्व कार्यक्रमासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे अशी विनंती अध्यक्ष नेताजी जाधव, माजी उपमहापौर संजय शिंदे व श्रीकांत प्रभू यांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta