Wednesday , March 4 2026
Breaking News

जनगणना सर्वेक्षणावेळी भाजप नगरसेवकांनी अधिकाऱ्यावर चढवला आवाज

Spread the love

 

बेळगाव : बेळगावात सुरू असलेल्या अनुसूचित जातींच्या अंतर्गत आरक्षणासाठीच्या सर्वेक्षणावेळी भाजप नगरसेवक संदीप जिरग्याळ यांनी थेट महानगरपालिका उपायुक्तांवरच आवाज चढवून वाद निर्माण केला. यावर काँग्रेसचे आमदार आसिफ सेठ यांनी मध्यस्थी करत शांतता राखण्याचे आवाहन केले.
अनुसूचित जातींच्या अंतर्गत आरक्षणासाठी सुरू असलेल्या सर्वेक्षणावेळी बेळगावमध्ये सोमवारी मोठा वाद उद्भवला. सदाशिवनगरमध्ये महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या उपस्थितीत उत्तर आमदार आसिफ सेठ यांच्या उपस्थितीत सर्वेक्षणाचा प्रारंभ करण्यात आला. सर्वेक्षणाची सुरुवात माजी महापौर सविता कांबळे यांच्या घरापासून होणार होती. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे मोबाईल अ‍ॅप डाउनलोड होण्यात अडथळा आल्याने, पुढे ही सुरुवात सामान्य नागरिकाच्या घरातून करण्यात आली.

याचवेळी कार्यक्रमस्थळी आलेले भाजपचे नगरसेवक संदीप जिरग्याळ यांनी महानगरपालिका उपायुक्तांशी थेट वाद घालून, आमदाराच्या सांगण्यावरून राजकारण करताय का? असा सवाल मोठ्या आवाजात उपस्थित केला. तेव्हा मध्यस्थी करत आमदार आसिफ सेठ यांनी, अधिकाऱ्यांशी अशा पद्धतीने उच्च स्वरात बोलू नये, असे जिरग्याळ यांना सांगितले. तांत्रिक अडचणीमुळे अ‍ॅप न चालल्याची माहिती अधिकारी देत असतानाच, नगरसेवक जिरग्याळ यांनी अधिकाऱ्यांनी शिष्टाचार भंग केला आहे, असे म्हणत संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी उपस्थितीत केली.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *