Wednesday , March 4 2026
Breaking News

ऑपरेशन सिंदूरमध्ये बेळगावची सून…

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव ही वीर राणी कित्तूर चन्नम्मा, क्रांतिवीर संगोळी रायण्णा, बेळवडी मल्लम्मा यांची क्रांतीची भूमी आहे. जेव्हा देशात क्रांती होते, तेव्हा अर्थातच क्रांतीच्या भूमीची भूमिका देखील असते. ऑपरेशन सिंदूरमध्ये बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील कोन्नूर गावातील सूनेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, ही बेळगाव जिल्ह्यातील लोकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

पाकिस्तानी दहशतवादाविरुद्ध भारतीय लष्कराचे “ऑपरेशन सिंदूर” यशस्वी झाले आहे. भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. त्यामुळे बंकरमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. ऑपरेशन सिंदूरची माहिती माध्यमांद्वारे उघड करणाऱ्या कर्नल सुफिया बेळगावची सून असणे ही अभिमानाची गोष्ट आहे.
“ऑपरेशन सिंदूर” जगासमोर आणणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांना सैन्य दलाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला अधिकारी होण्याचा मान मिळाला आहे. सोफियाचा नवरा बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील कोन्नूर गावचा आहे. पती-पत्नी दोघेही भारतीय सैन्यात कर्नल म्हणून कार्यरत आहेत. २०१५ मध्ये लग्न झालेल्या ताजुद्दीन आणि सोफियाचा प्रेमविवाह होता. कर्नल सोफिया मूळची गुजरात राज्यातील बडोद्याची आहे. सध्या सोफिया जम्मूमध्ये कर्नल म्हणून कार्यरत आहे, तर तिचे पती ताजुद्दीन बागेवाडी हे देखील झाशीमध्ये कर्नल म्हणून कार्यरत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *