बेळगाव : बेळगाव तालुक्यातील संतीबस्तवाड गावात कुराण धर्मग्रंथ चोरी आणि जाळल्याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल बेळगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ यांना निलंबित करण्यात आले आहे. शहर पोलिस आयुक्त याडा मार्टिन मारबान्यांग यांनी निलंबनाचा आदेश जारी केला आहे.
याबाबत पत्रकारांना माहिती देताना त्यांनी सांगितले की, कुराण जाळल्याप्रकरणी सीपीआय मंजुनाथ हिरेमठ यांना निलंबित करण्यात आले आहे. वरवर पाहता असे दिसते की त्यांच्या कर्तव्यात निष्काळजी दिसत होती. मुस्लिम समुदायानेही सीपीआयला निलंबित करण्याची मागणी केली.
संतीबस्तवाड प्रकरणात आरोपींची ओळख पटवण्यात त्यांच्याकडून निष्काळजीपणा झाल्याचे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta