बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव इलाईट आणि चिदंबरदास राजाराम महाराज पांडुरंग महाराज समाधी मंदिर कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या शनिवारी 17 मे 2025 रोजी सायंकाळी डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे ‘वजन आणि मधुमेह कमी करण्यासाठी डॉ. दीक्षित जीवनशैली’ या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
कै. डॉ. श्रीकांत जिचकर यांच्या प्रेरणेने आणि डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी सुरू केलेले लठ्ठपणा आणि मधुमेहमुक्त मोहिमेअंतर्गत महात्मा फुले रोड, शहापूर येथील लेक व्ह्यू हॉस्पिटल, गोवावेस जवळील श्री चिदंबर राजाराम आणि पांडुरंग महाराज समाधी मठ (राजाराम भवन) येथे उद्या सायंकाळी 5:30 ते 6:30 या कालावधीत हा मराठी व्याख्यानाचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्वांसाठी खुल्या असणाऱ्या या कार्यक्रमाचा नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने बहुसंख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ बेळगाव इलाईटचे अध्यक्ष सचिन हंगिरगेकर आणि सचिव विपुल मरकुंबी यांनी केले आहे.
व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून फक्त रुपये 250 अशा माफक दरात एचबीए1सी रक्त चांचणी शिबीर आयोजित केले जाणार आहे. तसेच विशाल इन्फ्राबिल्ड, जयगणेश, पहिला क्रॉस, गोडसेवाडी, टिळकवाडी, बेळगाव येथे रविवार दि. 18 मे 2025 रोजी सकाळी ठीक 10 वाजता डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या विनामूल्य डायबेटीस रिवर्सल केंद्राचे आणि डॉ. जगन्नाथ दिक्षित लाईफ स्टाईल कौन्सिलिंग सेंटरचे उद्घाटन होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta