
बेळगाव : जायंट्स ग्रुप बेळगांव परिवारतर्फे जागतिक मातृदिनाचे औचित्य साधून महागणपती देवस्थान लक्ष्मी रोड येथे ५ माता शांता केदनूरकर, मनीषा मासेकर, लक्ष्मी केळवेकर, संगीता पाटील, सुमन पोटे यांचा शाल, श्रीफळ, मानचिन्ह, पुष्पगुच्छ, आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींच्या वतीने मनीषा मासेकर यांनी सत्कार केल्याबद्दल जायंट्स ग्रुपचे आभार व्यक्त केले. प्रतीक पाटील यांनी प्रास्थाविक केले.
अध्यक्ष सचिन केळवेकर यांनी आपल्या भाषणात मातृदिनाबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी जायंट्स ग्रुप वेलफेअर फाऊंडेशनचे उपाध्यक्ष श्रीधन मुळीक, सचिव प्रवीण त्रिवेदी, जायंट्सचे उपाध्यक्ष तानाजी शिंदे, सदस्य शेखर जाणवेकर, अभिषेक वाईंगडे, राजू आष्टेकर, सचिन पैलवाणाचे, उपस्थित होते. तानाजी शिंदे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta