
बेळगाव : बेळगावमध्ये एक अमानुष कृत्य उघडकीस आले आहे. चुलीतील लाकडाने डोक्यात, हातावर आणि छातीवर मारल्याने एका तीन वर्षाच्या कोवळ्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील हारुगोप्पा गावात ही अमानुष घटना घडली. या मुलाची हत्या मद्यधुंद वडिलांनी आणि त्याच्या मित्रांनी केली. खून झालेल्या बालकाचे नाव कार्तिक मुकेश (३) असे आहे.
नराधम बाप हा मूळचा बिहारचा रहिवासी आहे. पती-पत्नीमध्ये भांडण झाले आणि पत्नी स्वयंपाक करत असताना त्याने चुलीतील लाकडाने मुलाच्या डोक्यावर, छातीवर आणि हातावर मारल्यामुळे मुलाचा जागीच मृत्यू झाला.
डीवायएसपी डॉ. वीरैया हिरेमठ, नेसरगी सीपीआय गजानन नाईक आणि पीएस वाहिद यादव यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मुरुगोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta