
बेळगाव : मराठा समाजातील यंदाच्या दहावी व बारावी परीक्षेत 90 टक्के गुण मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे.
मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे लवकरच एका खास समारंभात या विद्यार्थांचा सन्मान करण्यात येणार आहे.
तरी बेळगाव शहर, बेळगाव तालुका व खानापूर तालुक्यातील पात्र विद्यार्थ्यानी गुणपत्रिकेच्या झेरॉक्स व आयडेंटिटी आकाराचा फोटो, संपूर्ण पत्ता व व्हाटसअप नंबरसह मराठा समाज सुधारणा मंडळ कार्यालय, मेलगे गल्ली, शहापूर (वेळ सकाळी ११ ते दुपारी १.३० पर्यंत), मधू कणबर्गी, शंकर बेकरीच्या बाजूला, किर्लोस्कर रोड तसेच धनश्री सोसायटी, अनगोळ रोड, अनगोळ येथे दि. १० जून पर्यंत आणून द्यावी. अधिक माहितीसाठी मंडळाचे कार्याध्यक्ष शिवराज पाटील (9845960531) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta