Saturday , December 13 2025
Breaking News

अॕस्ट्रोटर्फ मैदान बेळगावात पूर्णत्वास नेऊ : खासदार जगदीश शेट्टर यांचे आश्वासन

Spread the love

 

मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिराचा समारोप

बेळगाव : बेळगाव हे हॉकीचे एक प्रमुख केंद्र असून येथून देशाला तीन ऑलिंपिकपटू दिले आहेत यामुळेच बेळगाव शहराला अॕस्ट्रोटर्फ मैदानाची नितांत गरज आहे व मी ती खेळ मंत्रालयाकडून पूर्णत्वास नेईन असे भरीव आश्वासन खासदार व माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी दिले.
हॉकी बेळगाव आयोजित मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिराचा समारोप समारंभात खासदार जगदीश शेट्टर प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. शनिवारी सायंकाळी लायन्स क्लब ऑफ टिळकवाडीच्या लायन्स भवन येथे संपन्न झाला.
व्यासपीठावर खासदार जगदीश शेट्टर, जय भारत फाउंडेशनचे सचिव नंदकुमार तलरेजा, मिस्टर इंडिया सुनील आपटेकर, अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, सचिव सुधाकर चाळके, उपाध्यक्ष विनोद पाटील हे होते.
प्रारंभी प्रकाश कालकुंद्रीकर यांनी हॉकी बेळगावची माहिती देऊन पाहुण्यांचे स्वागत केले.
जय भारत फाउंडेशनचे सचिव नंदकुमार तलरेजा बोलताना म्हणाले की हॉकी हा खेळ शारीरिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असून हॉकी बेळगाव ने मोफत प्रशिक्षण ठेवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले याबद्दल आम्ही आभारी आहोत तसेच हॉकी बेळगाव संस्थेला आपण भरीव मदत करू असे आश्वासन दिले.
प्रारंभी श्रमिका रमाकांत कार्यकर हिच्या भरतनाट्यमने कार्यक्रमास सुरुवात झाली तसेच सचिव सुधाकर चाळके यांनी प्रशिक्षण शिबिराची माहिती दिली. यावेळी डॉ. अनुपकुमार जांबोटी व मिस्टर इंडिया सुनील आपटेकर, रेवती समर्थ कार्यकर, धनश्री उत्तम शिंदे यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
खेळाडूंनी जीवनात यशस्वी होण्यासाठी शिस्त पाळावी, गुरुजनांचा आदर करावा, व्यायाम, आहाराचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे तसेच टीमच्या छोट्या छोट्या टेकनिकचा बारकाईने अभ्यास करा असे प्रशिक्षणार्थीना मिस्टर इंडिया व अर्जुन पुरस्कार विजेते सुनील आपटेकर यांनी मार्गदर्शन केले.
शिबिरात सहभागी 170 खेळाडू मुला मुलींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह वितरीत करण्यात आले. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यातर्फे दिशा अनिल राणे हिने प्रशिक्षक व हॉकी बेळगाव संघटनेचे आभार मानले.
यावेळी उत्तम शिंदे, सुरेश पोटे, दत्तात्रय जाधव, संजय शिंदे, मनोहर पाटील, गणपत गावडे, अनिल राणे, प्रकाश बिळगोजी, नामदेव सावंत, श्रीकांत आजगावकर, अश्विनी बस्तवाडकर, आशा होसमनी, सविता वेसणे, निखिल शिंदे, दयानंद कारेकर, समर्थ कारेकर, एस एस नरगोदी, शिवाजी जाधव, साकीब बेपारी, प्रशिक्षणार्थी व पालक आदी उपस्थित होते. शेवटी विकास कलघटगी यांनी आभार मानले.

 

About Belgaum Varta

Check Also

बी. के. मॉडेल हायस्कूलचा २० पासून शताब्दी सोहळा : अविनाश पोतदार

Spread the love  बेळगाव : सुमारे शंभर वर्षांपूर्वी, २ फेब्रुवारी १९२५ रोजी सात तरुण शिक्षकांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *