
बेळगाव : सुवर्णपदक विजेते विनोद मैत्री व आंतरराष्ट्रीय पंच म्हणून निवड झालेले राजेश गणपती लोहार यांचा शुक्रवारी चेंबर ऑफ कॉमर्सच्या सहभागृहात एसीपी बी. आर. कदम यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
थायलंड पटाया येथे दि 10 मे ते 13 मे 2025 दरम्यान गॅलेक्सी आयोजित जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये 60 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावणाऱ्या बेळगावच्या विनोद मैत्री या शरीर सौष्ठवपटूचा व त्या स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण झालेले बेळगावचे माजी राष्ट्रीय शरीर सौष्ठवपटू राजेश गणपती लोहार यांचा बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन अँड स्पोर्ट्स तसेच कर्नाटक स्टेट बॉडीबिल्डिंग असोसिएशन अँड स्पोर्ट्स यांच्यातर्फे गौरव सन्मान व सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बेळगाव ट्रॅफिकचे एसीपी बी. आर. निकम, अभिनेत्री प्राजक्ता चव्हाण, अनिल अंबरोळे, अभिनेता शशिकांत नाईक, अभिनेत्री निधी राऊळ, विकास कलघटगी, सुनील चौधरी, नारायण चौगुले, मल्लिकार्जुन मुगळी, रमेश देसुरकर, राजेंद्र जैन, रणजीत किल्लेकर, बाबू पावशे, सुनील बोकडे, भरत बाळेकुंद्री, विजय चौगुले, प्रकाश कालकुंद्रीकर, मनोहर पाटील, नामदेव सावंत, सुधाकर चाळके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अस्मिता क्रिएशन्सतर्फे सुमधुर संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अस्मिता क्रिएशन्सचे संतोष सुतार, अतीत बेलेकर, पवन हसबे, सोनाली रावगायकवाड, वीणा बांडगे, नीलम आठवले, विश्वास दळवी, ओमकार पाटील, मारुती लोहार, अमित लोहार यांनी विशेष परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta