Tuesday , December 16 2025
Breaking News

आनंदनगरमधील अपूर्ण नाला कामाचा रहिवाशांना फटका

Spread the love

 

नाल्यात पाणी व घाण साचल्याने परिसरात दुर्गंधी : महानगरपालिकेचे दुर्लक्ष

वडगाव : आनंदनगर दुसरा क्रॉस येथील नाल्याच्या अपूर्ण कामाचा येथील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. नाल्याचे काम अपूर्ण राहिल्यामुळे नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा व पाणी तुंबून राहत आहे, त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नाल्यात पाणी तुंबून राहिल्यामुळे परिसरातील विहिरींमध्ये सुद्धा नाल्याचे पाणी पाझरत आहे. त्यामुळे विहिरींचे पाणी सुद्धा खराब झाले आहे. गेल्या वर्षभरापासून या नाल्याचे काम अपूर्ण स्थितीत तसाच पडून आहे, त्याचा रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.. नाल्यामध्ये ड्रेनेजचे पाणी तुंबून राहिल्याने, आनंद नगरच्या नागरी वस्ती मध्ये दुर्गंधी पसरली आहे. नाल्यात साचलेल्या ड्रेनेजच्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, एक प्रकारे साथीच्या रोगांना आमंत्रणच मिळत आहे. तेव्हा तातडीने या नाल्याचे काम पूर्ण करावे, अशी आनंदनगर वासियातून मागणी होत आहे. सद्यस्थितीत नाल्यात साचलेला कचरा व घाण काढून नाला स्वच्छ करावा अशीही नागरिकांतून मागणी होत आहे.

साथीच्या आजारांना आमंत्रण
नाल्यामध्ये सतत ड्रेनेजचे पाणी तुंबून राहिल्यामुळे, कॉलरा, मलेरिया डेंग्यू, व हीवताप यासारखे आजार डोके वर काढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तेव्हा महागण नगरपालिकेने याकडे लक्ष देऊन तातडीने नाला स्वच्छ करावा व अपूर्ण नाल्याचे काम पूर्ण करावे अशी नागरिकतुन मागणी होत आहे.

धोकादायक नाल्यावर स्लॅब घालण्याची मागणी
सदर नाला हा आनंद नगर तिसरा क्रॉस, दुसरा क्रॉस व पहिला क्रॉस अशा नागरी वस्तीतून जात असल्यामुळे, कायम दुर्गंधी तर पसरणारच आहे, याशिवाय चुकून लहान मुले अथवा जनावरे या नाल्यात पडल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे, तेव्हा तातडीने या नाल्याचे काम पूर्ण करून यावर स्लॅब घालावा अशी रहिवाशांकडून मागणी होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

कडोली साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. महेंद्र कदम

Spread the love  बेळगाव : कडोली मराठी साहित्य संघ आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *