
बेळगाव : आज मंगळवार दि. 27 मे 2024 रोजी बेळगाव किल्ला शासकीय विश्रांतीगृह येथे कर्नाटक मराठा समाजाचे प्रमुख नेते व विधान परिषदचे आमदार माननीय श्री. एम. जी. मुळे यांची सदिच्छा भेट घेऊन होदेगिरी येथील छत्रपती शहाजी महाराज यांच्या समाधी विषयी चर्चा करण्यात आली. याप्रसंगी बेळगाव येथील प्रसिद्ध लेखक व इतिहास संशोधक डॉ. सरजू काटकर उपस्थित होते. नुकताच त्यांनी लिहिलेले व प्रकाशन झालेल्या “दि ग्रेट मराठा शिवाजी” पुस्तक श्री. मुळे साहेबांना व बेळगावचे माजी महापौर श्री. मालोजीराव अष्टेकर यांना देण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य आनंद आपटेकर, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, सकल मराठा पदाधिकारी विनय कदम, लक्ष्मण किल्लेकर उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta