
बेळगाव : दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या आणि सुमारे २०० वर्षांचा इतिहास लाभलेल्या बेळगावच्या श्री शनी मंदिरात आज श्री शनी जन्मोत्सव अत्यंत भक्तीभावाने साजरा करण्यात आला. पाटील गल्लीतील या प्राचीन शनी मंदिरात वैशाख वद्य अमावस्येनिमित्त श्री शनी महाराजांची जयंती उत्साहात साजरी झाली.
सूर्यदेवाच्या जन्मावेळी, पहाटे श्री शनी महादेवाचा जन्मोत्सव पार पडला. यानंतर रुद्राभिषेक, तैलाभिषेक, शनी शांती, तीळ होम, शनी रुद्र होम, अलंकार आणि महानैवेद्य यांसह विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सकाळपासूनच शनीदेवाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. भाविकांनी श्रद्धेने तैलाभिषेक करून शनीदेवाचे आशीर्वाद घेतले.

Belgaum Varta Belgaum Varta