
बेळगाव : बेळगावमध्ये कोरोनामुळे ७० वर्षांच्या वृध्दाचा मृत्यू झाल्याचे वृत्त हाती आले आहे. बिम्स हॉस्पिटलमध्ये सदर वृद्धावर उपचार सुरू होता. बुधवारी झालेल्या चाचणीत तो कोविड पॉझिटिव्ह आढळला होता.
तो बेळगाव तालुक्यातील बेनकनहळ्ळी गावचा रहिवासी असल्याचे समजते. वयाशी संबंधित आजारांनी ग्रस्त असलेल्या या वृध्दाला उपचारासाठी बिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर त्यांना ताबडतोब कोविड वॉर्डमध्ये हलवण्यात आले. उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचा रात्री उशिरा मृत्यू झाला. कुटुंबातील सदस्यांनी कोविड नियमांनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
Belgaum Varta Belgaum Varta