
बेळगाव : पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची घटना अनगोळ येथील दुर्गा कॉलनीमध्ये घडली असून पतीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहलेली “डेथ नोट” पोलिसांच्या हाती लागली आहे.
सुनील मूलीमणी (३३) यांनी आपल्याच कम्प्युटर रिपेरी दुकानात वायरने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या मृत्यूचे कारण पत्नी असल्याचे “डेथ नोट”मध्ये नमूद केले आहे. सध्या उद्यमबाग पोलिस ठाण्यात कलम १०८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनीलने चार वर्षांपूर्वी पूजाशी लग्न केले होते. त्यांना तीन वर्षांचा मुलगा देखील आहे. सुनीलने “डेथ नोट” म्हटले आहे की, ‘माझी पत्नी माझ्या मृत्यूचे कारण आहे.’ मृतदेह शवविच्छेदनासाठी बिम्स रुग्णालयाच्या शवागारात हलवण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta