
बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव प्राईड सहेली आणि NXT लेव्हल फिटनेस यांच्या संयुक्त विद्यमाने “चक दे” महिला ओपन क्रिकेट स्पर्धेचे आयोजन किकफ्लिक्स क्रिकेट टर्फ, बेळगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या स्पर्धेला शहरातील आठ महिला संघांचा सहभाग लाभला.
स्पर्धेचे उद्घाटन बेळगावचे महापौर श्री. मंगेश पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत, किसना डायमंड अँड गोल्डच्या मार्केटिंग प्रमुख मिसेस ट्विंकल, श्रीराम इनोव्हेशनचे मालक श्री. सचिन हंगिरगेकर, मुथूट फायनक्रॉपच्या हीरालाल व अंबिका मॅडम, आणि राज्यस्तरीय क्रिकेटपटू श्रेया पोटे उपस्थित होते.
जायंट्स परिवारचे युनिट सेक्रेटरी श्री. त्रिवेदी, क्रीडा समन्वयक श्री. गंगाधर आणि इतर मान्यवर सदस्यही कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
स्पर्धेत सहभागी संघ:
जीपी वॉरियर्स, ओपीएल डायनॅमिक गर्ल्स, बेळगाव पँथर्स, केएलई टायटन्स, बेळगाव बॅशर्स, योगिनीज, स्क्वॉड इंडिया, आणि पॉवर रेंजर्स.
सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलर्स, श्रीराम इनोव्हेशन, श्री चैतन्य अकॅडमी, मुथूट फायनक्रॉप, डॉ. सरनोबत क्लिनिक, समर्थ अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी, किरण एअरकॉन, दरगाशेट्टी सेल्स अँड को-ऑप, तसेच श्री. मंजुनाथ अलवानी यांचे सहकार्य लाभले आहे.
“चक दे” महिला ओपन क्रिकेट स्पर्धा ही महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि त्यांच्या खेळातील कौशल्याचा शानदार उत्सव ठरला. या उपक्रमाने बेळगावातील सामूहिक खेळ संस्कृतीला एक नवीन प्रेरणा दिली.
मिसेस आरती शाह (युनिट डायरेक्टर), मिसेस मोनाली शाह (आयपीपी), कार्यक्रम प्रमुख मिसेस अस्मिता जोशी, श्री. संतोष चव्हाण, तसेच जायंट्स प्राईड सहेलीच्या अध्यक्ष मिसेस जिग्ना शाह, उपाध्यक्षा मिसेस रश्मी कदम, आणि सर्व सदस्यांचे या यशस्वी उपक्रमात महत्त्वाचे योगदान लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta