
बेळगाव : महिलांचा सन्मान ही आपली संस्कृतीचं आहे, असे जिल्हा काँग्रेस समिती अध्यक्ष विनय नावलगट्टी म्हणाले.
बेळगावी ग्रामीण जिल्हा महिला काँग्रेसच्यावतीने काँग्रेस भवन बेळगाव येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष या नात्याने विनय नावलगट्टी उपस्थित होते.
माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींच्या फोटोची पूजा करून कार्यक्रमाला चालना देण्यात आली. यानंतर दोन ज्येष्ठ महिलांची पाद्यपूजा करून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महिला नेत्यांच्या हस्ते केक कापण्यात आला.
कार्यक्रमाला श्रीमती जयश्री माळगी, श्रीमती रोहिणी बाबशेट, श्रीमती अन्नपूर्णा असुरकर, नगरसेविका श्रीमती कुर्शीदा मुल्ला, श्रीमती तबस्सुम मुल्ला, श्रीमती मेघा देसाई यासह ईतर मान्यवर आणि महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta