Saturday , December 13 2025
Breaking News

संजीवीनी विद्याआधाराने दिला विद्यार्थिनीला शैक्षणिक आधार अश्विनी पुजारीला घेतले दत्तक

Spread the love

 

बेळगाव : वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांतून सतत मदतीचा हात पुढे करणाऱ्या संजीवीनी फौंडेशनच्या वतीने संजीवीनी विद्याआधारच्या माध्यमातून निपाणी तालुक्यातील ढोणेवाडी या गावची विद्यार्थिनी अश्विनी पुजारी हिला तिच्या शैक्षणिक वाटचालीसाठी दत्तक घेण्यात आले आहे.
अश्विनी पुजारी हिने दहावीच्या परीक्षेत ६२० गुण घेतले असून पुढे आय आय टी मधून अभियंता होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अश्विनीला पुढील शिक्षण घेण्यासाठी आर्थिक परिस्थितीमुळे अडचण येत असल्याचे समजताच संजीवीनी विद्याआधार मधून तिला तिचे संपूर्ण शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले.
त्यानुसार मंगळूर येथील अल्वाज प्री युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यात आला व तेथील वार्षिक शुल्क भरण्यात आले व वर्षभरातील वसतिगृह आणि खानावळीचा आर्थिकभार सुद्धा संजीवीनी पेलणार असल्याचे संस्थापिका डॉ सविता देगीनाळ यांनी सांगितले.
आदर्शनगर येथील संजीवीनी फौंडेशनच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात अश्विनी पुजार हिचा शाल गुलाबपुष्प भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ या उपस्थित होत्या.
लीलावती हिरेमठ यांनी बोलताना अश्विनी नक्षत्र खूप तेजस्वी असते आणि तू तुझ्या भावी आयुष्यात नक्कीच चमकणार असून तुझ्या यशाचे कौतुक करावे तितके कमीच आहे असे गौरवोद्गार काढले. संजीवीनी विद्या आधारचा आधार घेऊन तुझ्या स्वप्नांना गवसणी घाल व भविष्यात तुझ्यासारख्या अनेक गरजू अश्विनीना मदत करत जा असेही त्या म्हणाल्या.

कार्यक्रमाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून करण्यात आले. पाहुण्यांचा परिचय आणि स्वागत मिताली कुकडोळकर यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात राधा ताम्हणकर यांच्या स्वागतगीताने झाली.
लीलावती हिरेमठ यांचा तसेच अश्विनी पुजार हिच्या शिक्षिका मुक्ता मोटराचे यांचा शाल स्मृतिचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
मदन बामणे यांनी अध्यक्षीय समारोप करताना अल्वास कॉलेजमध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतरसुद्धा तिचा पुढील शैक्षणिक खर्च फौंडेशन करणार असल्याचे जाहीर केले व तिच्या शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शेवटी अश्विनी पुजार हिने फौंडेशनप्रती कृतज्ञता व्यक्त करून माझे ध्येय साध्य होईपर्यंत थांबणार नसल्याचे सांगितले.
यावेळी अभियंता आर. एम. चौगुले, सामाजिक कार्यकर्ते विकास पवार, येळ्ळूर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पराशराम मोटराचे, संस्थेचे सल्लागार संजय पाटील, डॉ. नविना शेट्टीगार, प्रीती चौगुले, विद्या सरनोबत, डॉ. तेजस्विनी, नई उमंग संस्थेच्या अध्यक्षा वैष्णवी नेवगीरी तसेच निमंत्रित मान्यवर व कर्मचारीवर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावित्री माळी यांनी केले तर आभार पद्मा औषेकर यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

म. ए. युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या शनिवार दिनांक १३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *