Monday , April 20 2026
Breaking News

असोसिएशन ऑफ फिजिकली हॅंडीकॅपड संस्थेमध्ये आर्थिक गैरव्यवहार; ऑडिट होईपर्यंत हंगामी कार्यकारिणी जाहीर

Spread the love

 

बेळगाव : शहापूर आळवण गल्ली येथील असोसिएशन ऑफ फिजिकली हॅंडीकॅपड या संस्थेमध्ये जमिनीचा गैरव्यवहार तसेच आर्थिक भ्रष्टाचार होत असल्याने संघटनेचे सभासद रस्त्यावर उतरले आहेत. असोसिएशन ऑफ फिजिकल हॅंडीकॅपड या संस्थेचे पदाधिकारी व सभासदानी जमिनीच्या गैरव्यवहारासंदर्भात माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. मात्र या निवेदनाचा फारसा परिणाम न झाल्याने संस्थेच्या काही सदस्यांनी सदर जमिनीच्या व्यवहारांवर न्यायालयीन स्थगिती मिळवली. या सदस्यांपैकी एक सदस्य या संस्थेमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी पदाधिकाऱ्यांविरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. पदाधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात इतर सहकाऱ्यांनी आवाज उठवून काम बंद आंदोलन सुरू केले व तात्काळ सदर कार्यकारिणी बरखास्त करण्याची मागणी केली. दरम्यान काल दिनांक 2 जून रोजी असोसिएशन ऑफ फिजिकल हॅंडीकॅप या संस्थेच्या सभासदांची तातडीची सर्वसाधारण सभा आळवण गल्ली शहापूर येथील संस्थेच्या गेट समोरच घेऊन संस्थेत चाललेल्या अनागोंदी कारभाराबद्दल चर्चा करून सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आले व संस्थेचे सभासद कट्टी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या कार्यकारिणीवर अविश्वासाचा ठराव मंजूर करून सदरची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. संस्थेचे ऑडिट रिपोर्ट होईतोपर्यंत सात सदस्यांची हंगामी कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली. सदर कार्यकारिणीमध्ये श्री. सचिन रामचंद्र पाटील, श्री. परशुराम कृष्णा मन्नोरकर, श्री. यल्लाप्पा नागेश बांदिवडेकर, श्री. शंकर बसया मास्तमर्डी, श्री. दिनेश सी. सिद्रगवली, ज्योतिबा नाईक, श्री, विजय पायस यांची नेमणूक करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

चित्ररथ मिरवणुकीस नरगुंदकर भावे चौकातून सुरुवात

Spread the love  बेळगाव : मंगळवार दि. २१ एप्रिल २०२६ रोजी शहराच्या ऐतिहासीक परंपरेनुसार सायंकाळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *