
बेळगाव : कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना बेंगलोर यांनी, आज बुधवारी बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आणि स्पर्धेवर बहिष्कार घातलेल्या २० क्लबच्या सदस्यांची बैठक बोलावली होती. कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेच्या सभागृहात झालेल्या तातडीच्या बैठकीत अध्यक्षांनी मानद अध्यक्ष आ. हरीश एन. ए. उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभीच अध्यक्ष हरीश एन. ए. बेळगाव आलेल्या सर्व क्लबच्या आणि संघटनेच्या कार्यकारी मंडळाची स्वागत करून, पुढे म्हणाले की बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनने घेतलेले वादग्रस्त निर्णय आणि आर्थिक घोटाळा, मनमानी कारभार, याचा संपूर्ण विचार करून कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेने बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आणि कार्यकारी मंडळ सध्या बरखास्त करत आहे. सध्या साखळी फुटबॉल स्पर्धा चालू असून ती स्पर्धा चालूच राहील. ज्या क्लबने बहिष्कार घातला आहे त्यांना आम्ही निलंबित करत नसून त्यांचे सदस्यत्व कायमस्वरूपी राहील. सध्या आम्ही दोन्ही बाजूंनी एक ऍडॉप्ट कमिटी कमिटी स्थापन करत आहोत. या कमिटीत क्लब आणि संघटनेचे सदस्य असतील. यांच्या देखरेखी खाली स्पर्धा पार पडेल. येत्या शुक्रवार दि. ४ जुलै रोजी कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेची नवीन कार्यकारी मंडळ स्थापना केली जाईल. कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेचे काही ज्येष्ठ सदस्य बेळगावला येऊन यापूर्वी बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेने केलेल्या आर्थिक घोटाळ्याची चौकशी व बँकेचा व्यवहार व जमाखर्च हिशोब पाहतील. संबंधित सदस्यावर मोठी कारवाई केली जाईल, असे आश्वासन संघटनेचे अध्यक्ष हरीश एन. ए. यांनी उपस्थित असलेल्या सदस्यांना दिल्यानंतर सगळ्यांनी टाळ्या वाजून या निर्णयाचे स्वागत केले.
याप्रसंगी कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेचे सेक्रेटरी कुमार, टेक्निकल डायरेक्टर असलम खान, बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष पंढरी परब, उपाध्यक्ष लेस्टर डिसोजा, सेक्रेटरी अमित पाटील, उपसेक्रेटरी प्रशांत देवदनम, एस एस नाडगोडी, त्याचप्रमाणे २० क्लबचे सदस्य राम हदगल, प्रणय शेट्टी, रवी चौगुले, सलीम फनीबंद, शाबास देसाई, विजय रेडेकर, पवन कांबळे आधी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta