
बेळगाव : बेळगाव जिल्हा जिम ओनर्स असोसिएशन यांच्यावतीने आज रविवार दि. 8 रोजी सर्वसाधारण बैठक शिवबसव प्लाझा फुलबाग गल्ली येथे घेण्यात आली. संस्थापक किरण कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत मागील वर्षांतील जमाखर्च सादर करण्यात आला. त्याचप्रमाणे एकमताने नवीन कमिटीची निवड करण्यात आली. नवीन कमिटी पुढीलप्रमाणे अध्यक्षपदी चेतन ताशीलदार तर उपाध्यक्ष नागेंद्र मडिवाल, राकेश वाधवा, विजय चौगुले, सेक्रेटरी कितीश कावळे, खजिनदार सचिन मोहिते, उपखजिनदार विशाल चव्हाण, उपसेक्रेटरी जय कामू, दयानंद निलजकर, कार्यकारी संचालक राजकुमार बोकडे, शेखर जाणवेकर, किरण पाटील, सभासद सुरेश धामणेकर, अश्विन निंगण्णवर, सलमान के, यश गस्ती व इतर सभासद उपस्थित होते. पुढील काळात जीम ओनर्स असोसिएशनतर्फे अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta