
बेळगाव : मराठा एकता एक संघटनतर्फे सालाबादप्रमाणे यंदाही तालुकास्तरीय बोर्ड परीक्षेत उत्तम गुण संपादित केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत संघटनेचे अमोल जाधव यांनी केले तर परिचय, शिवाजी कामनाचे,मोहन जाधव यांनी केले.
यावेळी परशरमभाऊ नंदिहळी यांनी बेळगावातील सिमावासियांची आजची दुरावस्था पाहता या मराठा संघटनेच्या माध्यमातून हरएक मराठा संघटित करा असे आवाहन केले. महापौर मंगेश पवार बोलताना म्हणाले, बेळगावातील आपल्या समाजाच्या दशेला एक नवी दिशा द्यायची असेल तर स्वयंस्फूर्तीने, स्वावलंबि, स्वाभिमानी तत्वाने, समाज एकत्र करणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. दशरथ बामणे बोलताना म्हणाले, आज आपल्या समाजातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून लांब जात असून वेगळ्या प्रवाहात भरकटत जात आहेत, हि खेदाची बाब आहे. असंघटित समाजाला एकत्र करन्यासाठी आम्हीही पूर्ण ताकतीने आपल्या मराठा संघटनेशी एकरूप होऊन कार्य करू असे आश्वासन त्यांनी दिले. आर्या गायकवाड बोलताना म्हणाल्या, हळूहळू परप्रांतीयांमुळे न्हावी, शिंपी, सुतार, चर्मकार, सोनार बांधकाम, कामगारांपासून रस्त्यावरील, व्यापारही, आपल्या मराठा समाजाच्या हातातून निसटला. परिणामी दिशाहीन मराठा समाज दुबळेपणाने आपल्याच बेळगावमध्ये स्थानिक हक्कापासून वंचित अवस्थेत आहे हि खेदाची बाब आहे.
यावेळी कार्यक्रमास उपस्थित विविध मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल गावडे यांनी तर आभार मोनापा शहापूरकर यांनी मानले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विश्वभारत सेवा समितीचे संस्थापक, माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळी, महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, जेष्ठ मार्गदर्शक संजीव जाधव, आधार एज्युकेशन सोसायटी चेअरमन डॉ.दशरथ बामणे, नवतरुण राम इनोवेशनचे मालक सचिन हंगरगेकर, जेष्ठ शंकर चौगुले, सुनील खांडेकर, संदीप ओऊळकर, आर्या गायकवाड, संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, विद्यार्थी आणि विविध मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta