
येळ्ळूर : सुळगे- येळ्ळूर येथील विज्ञान विषयाचे निवृत्त शिक्षक के एन पाटील यांनी सुळगे (येळ्ळूर) येथील भावकेश्वरी माध्यमिक विद्यालयाला संगणक देणगी दाखल दिला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी ए खोरागडे होते. मुलींच्या ईशस्तवन व स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापक डी ए खोरागडे यांनी निवृत्त विज्ञान शिक्षक के एन पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी बोलताना के एन पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी व्हायचे असल्यास, अभ्यासक्रमाबरोबरच संगणक ज्ञानही तितकेच महत्त्वाचे आहे, सर्वच क्षेत्रे आता संगणकाने व्यापून गेली आहेत. तेव्हा विद्यार्थ्यांना आज संगणकाचे ज्ञान अत्यावश्यक झाले आहे. कार्यक्रमाला ए वाय मजुकर, शिक्षिका यु एस हट्टीकर, सौ. देसाई, सौ. चव्हाण, अनिल कुकडोळकर यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta