
बेळगाव : जायंट्स आय फौंडेशन आणि जायंट्स मेन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक नेत्रदान दिनाचे औचित्य साधून सदाशिवनगर स्मशानभूमीत नेत्रदान जनजागृती फलकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी उपस्थितांचे स्वागत सचिव विजय बनसुर यांनी केले तर प्रास्ताविक माजी अध्यक्ष शिवराज पाटील यांनी जायंट्स आय फौंडेशनच्या स्थापनेपासून सुरू असलेल्या कार्याची माहिती दिली.
प्रमुख पाहुणे अभियंता आर एम चौगुले यांनी प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करावा असे आवाहन केले.
त्यानंतर जायंट्स मेनचे अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांनी आपल्या कार्यबाहुल्यामूळे समाजासाठी कार्य करू शकला नसला तरी आपल्या मृत्यूनंतर नेत्रदान करून आपले सामाजिक योगदान द्यावे असे सांगितले.
अध्यक्षीय समारोप करताना मदन बामणे यांनी २०१८ साली सुरू झालेल्या जायंट्स आय फौंडेशनच्या माध्यमातून दीडशेहून अधिक जणांनी मरणोत्तर नेत्रदान केले असून यामुळे तीनशेहून अधिक दृष्टिहीनांना ही सुंदर सृष्टी पाहण्याचे भाग्य मिळाल्याचे सांगीतले.
आभार अशोक हलगेकर यांनी मानले.
यावेळी संचालक उमेश पाटील, अजित कोकणे, प्रदीप चव्हाण, राहुल बेलवलकर, वाय एन पाटील, राजू बांदिवडेकर, प्रकाश तांजी, सुनील मुरकुटे, सुरेश पाटील, आमोद मुचंडीकर, जीवन कदम, प्रसाद कदम, राज सावगावकर व इतर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta