Saturday , March 7 2026
Breaking News

सेंट अँथनी चर्च येथे 13 रोजी वार्षिक फेस्तचे आयोजन…

Spread the love

 

बेळगाव : फिश मार्केट, कॅम्प, बेळगाव येथील सेंट अँथनी चर्च येथे शुक्रवार दि. 13 जून 2025 रोजी सेंट अँथनी यांचे वार्षिक फेस्त साजरे होत असून भक्तांनी फेस्तमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सेंट अँथनी वार्षिक फेस्तप्रसंगी बेळगाव शहराच्या विविध भागातून आणि शहराच्या आसपासच्या गावांमधून हजारो यात्रेकरू त्यांच्या प्रार्थना आणि नवस घेऊन चर्चला भेट देतात आणि त्यांच्या प्रार्थनांचे उत्तर मिळते असा त्यांचा विश्वास असल्याची माहिती चर्चचे पॅरिश प्रिश्ट फादर विजय मेंडीथ यांनी दिली. सेंट अँथनी वार्षिक फेस्तच्या पार्श्वभूमीवर गेल्या 31 मे पासून दररोज संध्याकाळी याप्रमाणे 13 दिवसांची ट्रेझिना (विशेष प्रार्थना) आयोजित केली जात आहे. फेस्ताची मुख्य प्रार्थना येत्या शुक्रवारी संध्याकाळी 5:30 वाजता आयोजित केली आहे. बेळगावचे बिशप रेव्हरंड डॉ. डेरेक फर्नांडिस हे या उत्सवाची मुख्य प्रार्थना सादर करणार आहेत. अनेक फादर्स आणि नन्स मोठ्या संख्येने विशेष प्रार्थना आणि उत्सवात सहभागी होणार आहेत. तरी भाविकांनी मोठ्या संख्येने या प्रार्थना उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन सेंट अँथनी चर्चचे रेव्ह. फादर विजय मेंडीथ यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी भाविकांनी 9480751121, अथवा 8722686475 या क्रमांकावर संपर्क साधावा असेही कळविण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

कलखांब गावच्या राहुल पाटीलचे युपीएससी परीक्षेत दुसऱ्यांदा यश; 224 वा क्रमांक

Spread the love  बेळगाव : बेळगाव जवळील कलखांब गावच्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने जिद्द, चिकाटी आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *