बेळगाव : जायन्ट्स ग्रुप बेळगांव परिवारतर्फे संस्थापक, स्वर्गीय श्री. नाना चुडासमा जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी स्थानिक १९ नंबर शाळा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने विद्यार्थ्यांना वह्या, केक आणि अल्पोपहार वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यात आला आणि नाना चुडासमा यांची आठवण साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने झाडे लावण्याचा उपक्रम देखील पार पडला, ज्यामध्ये १० वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली. हा उपक्रम पुढील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आला. अध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष तानाजी शिंदे, फेडरेशन सचिव प्रविण त्रिवेदी, फेडरेशन अधिकारी एम. गंगाधर, सदस्य प्रशांत सुगंधी, अभिषेक वाईगडे, राजू टिकेकर, शाळा नंबर १९ चे शिक्षिका सविता चंदगडकर आणि इतर शिक्षक परिवार सदस्यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला आणि स्व.नाना चुडासमा यांच्या विचारांना खरी आदरांजली ठरली.
Belgaum Varta Belgaum Varta