बेळगाव : रणझुंझार शिक्षण संस्थेचे रणझुंझार हायस्कूल विद्यामंदिर व काॅन्व्हेंट स्कूल निलजी मध्ये कै.नारायणराव चुडामणी मोदगेकर यांच्या स्मरणार्थ कै. नारायण चुडामणी मोदगेकर प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रणझुंझार शिक्षण संस्थेचे संचालक मारुती गाडेकर हे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून रणझुंझार साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब नारायण मोदगेकर होते. कार्यक्रमाची सुरुवात रणझुंझार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनींनी ईशस्तवन व रणझुंझार विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनींच्या स्वागत गीताने केली. प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत रणझुंझार हायस्कूलचे मुख्याध्यापक वाय. पी. पावले यांनी केले. त्यांनी कै. नारायणराव मोदगेकर यांच्या संपूर्ण जीवनाचा आढावा घेतला. प्रमुख अतिथी म्हणून रणझुंझार शिक्षण संस्थेचे संचालक अमर मोदगेकर हे होते. मान्यवराच्या हस्ते फोटो पूजन करण्यात आले आणि त्यानंतर रणझुंझार शिक्षण संस्थेच्या गरिब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta