Wednesday , March 4 2026
Breaking News

कित्तूरजवळ ट्रकची खाजगी बसला पाठीमागून धडक; ट्रक पलटी

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील अंबडगट्टी क्रॉसजवळ आज सकाळी भरधाव धावणाऱ्या एका खाजगी बसला ट्रकने मागून धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की अक्षरशः ट्रक उलटला. या घटनेत ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे.

बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील अंबडगट्टी क्रॉसजवळ एस एस ट्रॅव्हल्स कंपनीची खाजगी बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. बंगळुरूहून बेळगावच्या दिशेने येत असलेल्या बसला ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. या घटनेमुळे ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनास्थळी कित्तूर पोलिसांनी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने बस चालकाला वाचवले. ही घटना कित्तूर पोलीस ठाण्याजवळ घडली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *