Wednesday , March 4 2026
Breaking News

सामाजिक कार्यकर्ते श्री. नेताजी जाधव यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात रविवारी बैठक

Spread the love

 

बेळगाव : बेळगांवच्या राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रात कार्य करणारे माजी नगरसेवक श्री. नेताजी नारायणराव जाधव हे १३ ऑगस्ट २०२५ रोजी वयाची ७५ वर्षे पूर्ण करीत आहेत. या निमित्ताने त्यांचा अमृत महोत्सव साजरा करण्याचे ठरविण्यात आले असून याबाबत रविवार दि. २२ जून २०२५ रोजी, सायंकाळी ४.३० वा. मराठा मंदिर, खानापूर रोड, बेळगाव येथे कार्यकर्त्यांची एक बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस आपण उपस्थित राहून कार्यक्रमाच्या रुपरेषेबाबत मार्गदर्शन करावे ही विनंती. या बैठकीतच स्वागत समिती नेमावयाची आहे, तरी हितचिंतक बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. मनोहर किनेकर, श्री. मालोजी अष्टेकर, श्री. प्रकाश मरगाळे, श्री. अनंत लाड,  श्री. व्ही. एस. जाधव (गुरुजी), श्री. आप्पासाहेब गुरव, श्री. रमेश सोंटक्की, श्री. अशोक चिंडक, श्री. राजाराम सुर्यवंशी, श्री. प्रदिप शट्टीबाचे यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *