
बेळगाव : भ्रष्टाचार आणि काँग्रेस हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भ्रष्टाचार सोडल्यास काँग्रेस नाही आणि काँग्रेस सोडल्यास भ्रष्टाचार नाही, असे विधान परिषदेचे सदस्य सी. टी. रवी यांनी केले असून राज्यातील काँग्रेस सरकारवर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.
सोमवारी बेळगावात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. हा काही खाजगी विषय नाही. या प्रकरणाची विद्यमान न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली चौकशी करा. त्यापूर्वी जमीर अहमद यांचा राजीनामा घ्या. गॅरंटी योजना दिल्या म्हणजे भ्रष्टाचाराचा परवाना मिळाला असे नाही. तुम्ही विभागांमध्ये ‘रेट कार्ड’ लावा, असा टोलाही त्यांनी लगावला. राजू कागे हे भाजपचे आमदार नाहीत, तरीही त्यांनी सरकारमध्ये एक पैशाचेही काम होत नसल्याचे म्हटले आहे, असेही सी. टी. रवी म्हणाले.
काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी केवळ भाववाढ करण्याचे मोठे काम केले आहे. वर्क ऑर्डर मिळत नाहीत. राजू कागे यांनी सत्य सांगितले आहे, असेही ते म्हणाले. तुमच्याकडे अजून तीन वर्षे आहेत, आत्मपरीक्षण करा. सत्ताधारी पक्षाचे लोक बोलत आहेत, म्हणजे मुख्यमंत्री पूर्वग्रहदूषित बोलत आहेत असे म्हणणे आता योग्य नाही, असे म्हणत त्यांनी सरकारला फटकारले.
Belgaum Varta Belgaum Varta