
2 कोटींचा निधी मंजूर
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील 3 प्रमुख रस्त्यांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करून कामाला चालना देण्यात आली. ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या अनुपस्थितीत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते रस्त्याच्या कामाला चालना देण्यात आली. यावेळी काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर उपस्थित होते.
मोदगा गावाला 1 कोटी आणि बाळेकुन्द्री के.एच. गावासाठी 50 लाख निधी मंजूर झाला असून सिमेंट काँक्रिटचे रस्ते करण्यात येणार आहेत. सदर कामासाठी 2 कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
यावेळी तेजु मारिहाळ, सुभाष पाटील, प्रकाश कड्यागोल, शिवानंद पाटील, बसवराज कल्लूर, कल्लाप्पा रामचनावर, निलेश चंदगडकर, शहबाज, विठ्ठल पाटील व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta