
बेळगाव : बेळगावच्या समर्थ नगरमध्ये रिक्षा भाड्याचे पैसे मागितल्याने चार-पाच जणांच्या टोळक्याने एका रिक्षाचालकावर प्राणघातक हल्ला करून पळ काढल्याची घटना घडली आहे.
बसस्थानकावरून रिक्षात बसून समर्थ नगरपर्यंत सोडण्यास सांगितलेल्या रिक्षाचालक अल्ताफ हुसेन यांनी ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यावर रिक्षाचे भाडे मागितले. त्यावेळी चार-पाच जणांच्या टोळक्याने लाकडी काठीने त्यांच्यावर हल्ला केला आणि तेथून पळ काढला. जखमी चालक अल्ताफ यांना स्थानिकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta