
बेळगाव : पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये शहापूर पोलीस स्टेशनच्या पीएसआय एस. एन. बसवा मॅडम यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थ विरोधी शपथ देऊ केली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर कॉन्स्टेबल संदीप बागडी यांनी अमली पदार्थ घेतल्यामुळे कोण कोणते दुष्परिणाम होते असे अनेक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले. तसेच भारती कोळी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थ सेवन न करण्याचे आवाहन केले. नंतर विश्वभारत सेवा समितीचे सेक्रेटरी श्री. प्रकाश नंदिहळी यांनी अमली पदार्थ हे आपल्याला किती घातक आहेत उदाहरणासह त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कॉलेजच्या प्राचार्या ममता पवार यांनी अमली पदार्थ तसेच सिगारेट गुटखा याच्या आहारी जाऊ नये असे आवाहन केले व मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी शहापूर पोलीस स्टेशनच्या एएसआय ए. के. पाटील, हेड कॉन्स्टेबल सहा देवी मॅडम, कॉलेजचे शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर नागेनहट्टी आणि आभार प्रदर्शन डॉ. स्मिता मुतगेकर यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta