
बेळगाव : जय जन कल्याण सौहार्द सहकारी संघ नियमित, मण्णूर संचलित, जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक फौंडेशन मण्णूर मार्फत मण्णूर गावातील मराठी प्राथमिक शाळा व कन्नड प्राथमिक शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले, सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून फौंडेशनचे अध्यक्ष एल के कालकुंद्री सर उपस्थित होते.
प्रारंभी सरस्वती फोटोचे पूजन सर्व महिला संचालक यांच्या हस्ते तसेच दिपप्रज्वलन फौंडेशनचे अध्यक्ष एल के कालकुंद्री सर व संस्थेचे चेअरमन लक्ष्मण मंडोळकर यांच्या हस्ते व व्हा. चेअरमन संदीप कदम व संचालक व सल्लागार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक संस्थेचे व्यवस्थापक महेश काकतकर यांनी केले, यानंतर शाळेतील गरजू व गरीब मुलांना वही, अंकलिपी व पेन्सिल, पट्टीचे वाटप करण्यात आले. तसेच आतापर्यंत फौंडेशन मार्फत विविध कार्य केलेली आहेत यामध्ये मुलांसाठी सामान्यज्ञान स्पर्धा, कोरोना काळात आर्सेनिक अलबम या गोळ्यांचे वाटप, गावातील माजी सैनिकांचा सत्कार, गावातील 80 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम असे विविध उपक्रम आम्ही राबविलेले आहेत, या पुढेही ही संस्था समाज कार्यात अग्रेसर राहील.
या कार्यक्रमाला चेअरमन लक्ष्मण मंडोळकर, व्हा. चेअरमन संदीप कदम, संचालक जोतिबा शहापूरकर, विनायक कालकुंद्री, सागर डोणकरी, संतोष केंचनावर, भरमा आनंदाचे, कल्लाप्पा तोरे, बसवंत नाईक, ब्रिजेश देवरमनी, सुधा बाळेकुंद्री, कविता सांबरेकर, सल्लागार परशराम कदम, शीतल चौगुले, लता कडोलकर, जयवंत मंडोळकर तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते,
Belgaum Varta Belgaum Varta