
बेळगाव : गायींची अवैध तस्करी करण्यासंदर्भात जाब विचारण्यास गेल्याच्या कारणावरून हुक्केरी तालुक्यातील इंगळी गावात श्रीरामसेनेच्या पाच कार्यकर्त्यांना झाडाला बांधून मारहाण करण्यात आल्याची घटना यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली असून या घटनेमुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वी, गायींची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी गायींची वाहतूक करणारे वाहन थांबवले आणि गायींची सुटका केली. सुटका केलेल्या गायींना इंगळी जवळील एका गोशाळेत नेण्यात आले होते. मात्र त्यानंतर थोड्याच वेळात गोशाळेतून दुसऱ्या ठिकाणी वाहनात घेऊन जात असल्याचे समोर आले आहे. ही बाब समजल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा, “तुम्ही गायी कुठे घेऊन जात आहात?”असा प्रश्न उपस्थित केला. प्रश्न विचारल्याबद्दल पाच श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना नारळाच्या झाडाला बांधून काठ्यांनी मारहाण करण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta