
बेळगाव : बेळगावमध्ये एका ग्रामपंचायत सदस्याने सार्वजनिकरित्या हवेत गोळ्या झाडल्या, हातात चाकू धरून बेधुंद होऊन वाढदिवस साजरा केला.
बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील कुडची शहरात एका ग्रामपंचायत सदस्याने गुंडासारखे वर्तन केले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बाबाजान खलीमुंडसाई यांनी हवेत गोळ्या झाडून, हातात चाकू धरून आणि बेधुंद होऊन आपला वाढदिवस साजरा केला आहे. तो पोलिस स्टेशनच्या अगदी शेजारी असूनही, तो कोणत्याही भीतीशिवाय बेधुंदपणे वागणे त्याला महागात पडले. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सतर्क होऊन बाबूजानला अटक केली. कुडची पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta