
हुक्केरी : अवैध गो तस्करी करणाऱ्यांची अडवणूक करणाऱ्या श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ३ जुलै रोजी हुक्केरी बंदचा इशारा देण्यात आला आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर, श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांच्या नेतृत्वाखाली “चलो इंगळगी” निषेध रॅली काढण्यात येणार आहे.
श्रीराम सेनेचे प्रदेशाध्यक्ष गंगाधर कुलकर्णी यांनी या संदर्भात बोलताना सांगितले की, कार्यकर्त्यांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरलेल्या राज्य सरकार आणि पोलिस यंत्रणेवर कठोर कारवाई करावी. अन्यथा, त्यांनी ३ जुलै रोजी हुक्केरी येथे बंदचा इशारा दिला आहे. हल्ल्याच्या घटनेमुळे हिंदू कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे, श्रीराम सेनेच्या नेत्यांनी राज्य सरकार आणि पोलिसांच्या दुर्लक्षावर जोरदार टीका केली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta