
बेळगाव : नुकत्याच गोवा फोंडा येथील सडा आंतरराष्ट्रीय जलतरण तलावात फिट फॉर लाईफ संस्थेतर्फे आयोजित केलेल्या निमंत्रितांच्या आंतरराज्य जलतरण स्पर्धेत बेळगाव आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करताना तीन वैयक्तिक चॅम्पियनशिपसह 28 सुवर्ण 19 रौप्य व 17 कांस्य अशी एकूण 64 पदकांची लयलूट केली.
कुमार मोहित काकतकर याने मुलांच्या ग्रुप तीन तर मुलींच्या ग्रुप तीन मध्ये कुमारी आरोही अवस्थी व कुमार हर्षवर्धन कर्लेकर मुलांच्या ग्रुप पाच यांनी आपल्या गटातील वैयक्तिक चॅम्पियनशिप मिळवीली. सविस्तर कामगिरी पुढील प्रमाणे.
मुले गट क्रमांक 5 कुमार हर्षवर्धन कर्लेकर तीन सुवर्ण एक रौप्य, गट क्रमांक चार- कुमार अद्वैत जोशी दोन सुवर्ण एक रौप्य तीन कांस्य, गट क्रमांक तीन- कुमार मोहित काकतकर नऊ सुवर्ण एक रौप्य कुमार वर्धन नाकाडी चार सुवर्ण एक रौप्य तीन कांस्य, गट क्रमांक दोन- कुमार अथर्व अवस्थी एक सुवर्ण दोन कांस्य, कुमार वरून जोगमनावर एक सुवर्ण एक कांस्य, कुमार अनिश काकतकर दोन कांस्य गट क्रमांक एक- कुमार पवन हिरेमठ दोन कांस्य. मुली गट क्रमांक चार-कुमारी आरोही अवस्थी तीन सुवर्ण चार रौप्य एक कांस्य.
गट क्रमांक तीन- कुमारी निधी मुचंडी ३ सुवर्ण सात रौप्य कुमारी अमूल्या केष्टीकर दोन सुवर्ण तीन रौप्य दोन कास्य, कुमारी श्रेया जोगमनावर एक रौप्य एक कांस्य.
वरील सर्व जलतरणपटूंना आबा व हिंद क्लबचे एन आय एस जलतरण प्रशिक्षक श्री. विश्वास पवार, श्री. अमित जाधव, रणजीत पाटील, संदीप मोहिते, किशोर पाटील, मारुती घाडी यांचे बहुमोल मार्गदर्शन तर आबा क्लबचे अध्यक्ष श्री. शितल हुलबत्ते, मोहन सप्रे व अरविंद संगोळी यांचे प्रोत्साहन लाभते.

Belgaum Varta Belgaum Varta