
बेळगाव : गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बेळगावमधील चव्हाट गल्लीतील एका घराची पडझड होऊन दोन ऑटो रिक्षा आणि एका दुचाकीचे नुकसान झाले.
बेळगावमधील चव्हाट गल्लीतील कल्याण चौकाजवळ असलेले किसन शहापूरकर यांच्या मालकीचे घर मुसळधार पावसामुळे कोसळले. सुदैवाने, घरात कोणीही राहत नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र, घरासमोर उभ्या असलेल्या दोन ऑटो रिक्षा आणि एका दुचाकीचे मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती घरमालकांनी संबंधित महसूल आणि पोलीस विभागाला दिली आहे. हे घर जुने असल्यामुळे पडझडीच्या स्थितीत होते. त्याची दुरुस्ती केल्यानंतर परत येण्याच्या विचाराने किसन शहापूरकर यांचे कुटुंब गेल्या दोन-तीन महिन्यांपासून दुसऱ्या ठिकाणी राहत होते, अशी माहिती समोर आली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta