
बेळगाव : येथील सिद्धार्थ बोर्डिंग मधील घरे पावसामुळे मोडकळीस आली होती. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन जीवन संघर्ष फाउंडेशनच्या वतीने येथील कुटुंबाला घर बांधून देण्याकरिता डॉक्टर गणपत पाटील यांनी मदत देऊ केली आहे. त्याकामाचा भूमिपूजन कार्यक्रम आणि कॉलमभरणी कार्यक्रम आज डॉ. गणपत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.
येथील चंद्रकांत हिरेमठ यांचे घर कोसळल्याने सदर कुटुंबीय उघड्यावर आले असून त्यांना घर बांधून देण्याकरिता डॉ. गणपत पाटील त्यांनी पुढाकार घेतला आहे.
याठिकाणी घर बांधण्याबरोबरच सिद्धार्थ बोर्डिंगमधील विद्यार्थ्यांना मेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सदर बांधकाम विनामूल्य करून देण्यात येत आहे. यासाठी गणपत पाटील यांनी पुढाकार घेतल्याने कुटूंबियांना हक्काचे छप्पर मिळत असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले असून डॉ. गणपत पाटील यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे .
Belgaum Varta Belgaum Varta