
दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांचा तातडीचा आदेश
खानापूर : बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अनमोड घाटातील रस्ता पूर्णपणे खचल्याने वाहतूक धोकादायक बनली आहे. मागील दोन दिवसांपासून जमिनीत भेगा पडत होत्या. अखेर शनिवारी पहाटे चारच्या सुमारास संपूर्ण रस्ता दरडीसह खाली कोसळला.
या घटनेनंतर दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने आदेश काढून 2 सप्टेंबर 2025 पर्यंत अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद केली आहे. या आदेशानुसार, अनमोड घाटमार्गातून अवजड वाहतूक बंद राहणार आहे. स्थानिक नागरिक, प्रवासी आणि मालवाहतुकीच्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अवजड वाहतुकीवर दुहेरी मर्यादा
अनमोड घाट हा सध्या कर्नाटक आणि गोवा यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गांपैकी एक आहे. विशेषतः कुसमळी येथील मलप्रभा नदीवर नवीन पुलाचे काम सुरू असल्याने त्या ठिकाणीही जड वाहनांवर बंदी आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक अनमोड घाट मार्गावरून वळवण्यात आली होती. आता हा रस्ता खचल्यामुळे त्या वाहतुकीवरही पूर्ण विराम लागण्याची शक्यता आहे.
Belgaum Varta Belgaum Varta